हणमंतवाडी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

हणमंतवाडी : हणमंतवाडी येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हणमंतवाडी या हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ वडणगेचे युवा नेते रवींद्र बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

21 व्या शतकामधील विद्यार्थी आत्मनिर्भर तसेच सर्वगुण संपन्न घडायचा असेल तर शालेय विद्यार्थाना ग्रामीण मैदानी खेळ खेळावेच लागतील असे मत आपल्या मनोगतीय भाषणात व्यक्त केले .वार्षिक क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर कला सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री प्रशांतकुमार पोतदार होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा.डॉ.सुनील गंगा भोसले सर मुख्याध्यापक श्री के एस पोतदार सर श्री जे एस पोतदार सर श्री एस एस यादव सर श्री पी एस पाटील सर श्री एस के थोरात सर ऋतुराज पाटील अक्षय दिंडे उपस्थित होते.

🤙 8080365706