पाणी पिण्याची योग्य वेळ, पद्धत माहित असणं गरजेचं..

आरोग्य टिप्स : जेवताना पाणी कधी प्यावे यासंदर्भात आयुर्वेदात काय सांगितले जे आहे ते जाणून घेऊयात.

जेवणाअगोदर पाणी पिणे म्हणजे अमृत समान आहे असे आयुर्वेदात म्हटले आहे. जेवणा अगोदर पाणी पिण्याचा फायदा हा शरीराला होतो. पाणी प्यायल्याने पोट थोडे भरते, यामुळे अन्नाचे कमी सेवन होते. पोटाचे अदृश्य ४ सामान भाग करावे. त्यातील एका भागात पाणी, दुसऱ्या भागात हवा आणि उरलेल्या २ भागात जेवण अशी विभागणी करा. ज्यामुळे आपल्या पोटाला त्रास सहन करावे लागणार नाही. जेवणाच्या अगोदर पाणी पिणे उत्तम ठरेल, त्या पाण्याला अमृतसमान असे म्हटले गेले आहे.

आयुर्वेदानुसार जेवणासोबत पाणी पिणे योग्य मानले आहे. जेवणासोबत पाणी पिणे म्हणजे आनंदासमान आहे. जेवताना थोडे थोडे पाणी प्यावे. ही प्रक्रिया पचनासाठी उत्तम मानली गेली आहे. जर आपली पचनक्रिया हळू असेल तर, जेवताना एक – एक पाण्याचे घोट पीत जेवण करा. याने आपल्याला नक्कीच फायदा होईल. इतर पेयांपेक्षा जेवताना नेहमी पाण्याला प्राधान्य द्या. साखरेयुक्त पेय पिऊ नका.

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आयुर्वेदात या प्रक्रियेला विषसमान मानले आहे. कारण अन्नाचे सेवन केल्यानंतर पचनक्रियेला सुरुवात होते. पचनक्रिया सुरु झाल्यानंतर शरीरात एक भट्टी सुरु होते. अशावेळी पाणी प्यायल्याने ती भट्टी थंड पडते. ज्यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत पचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे जेवानंतर तात्काळ पाणी पिऊ नये.अनेकांना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवयी असते. ही सवय पचनसंस्थेसाठी घातक मानले गेले आहे. आपला सकस आहार झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १ किंवा अर्ध्या तासानंतर पाणी प्या. याने शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. पचनाची प्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराला नक्कीच याचा फायदा होतो.

🤙 8080365706