
कागल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीबांना एक वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. तसेच करसवलतीमुळेसुद्धा दिलासा मिळणार आहे. रोजगार निर्मितीस चालना देण्याच्या तरतुदीमुळे युवकांना फायदा होणार आहे.या अर्थसंकल्पात सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.सुक्ष्म व लघू उद्योगांसाठीच्या भरीव तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील सहकारी संस्था यांची जाळे मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलां, युवक यांचेसाठी विशेष तरतूद. महिलांसाठी केलेल्या विशेष तरतुदीमुळे महिला सबलीकरणास प्रोत्साहन मिळणार आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून या अर्थसंकल्पाचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.या सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. असेही ते म्हणाले आहेत.
