विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक संसोधनावर भर देण्याची गरज-डॉ.डी. जी. गुणे

कोल्हापूर : जीवनशैली, दैनंदिन सवयी यासाठी दैनंदिन जीवनामध्ये वावरताना संतुलित आहार, योग्य दिनचर्या व आयुर्वेदाचा पुरेपूर वापर करण्याची गरज आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेद संशोधनावर भर दिला पाहिजे असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. डी जी. गुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, संचालित न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात डॉ. गुणे बोलत होते . कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालन व छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.जी.बोराडे, तसेच कार्यक्रमास चेअरमन के.बी. पाटील, व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानिस य्हाय. एस. चव्हाण व संस्थेच्या सर्व पधाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. बोराडे यांनी विध्यार्थांना मार्गदर्शन केले व संस्था सोयी-सुविधा पुरविण्यास कोठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.

चेअरमन के.जी. पाटील यांनी लवकरच संस्थेचे बी फार्मसी सुरु करण्यात येईल असे सांगितले व विद्यार्थांना सुभेछ्या दिल्या. व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी देखील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी खजानिस. व्हा. एस. चव्हाण यांनी विध्यार्थाना शुभेछ्या दिल्या.

कार्याक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे विकास आधिकारी डॉ. संजय दाभोळे यांनी संस्थेचा मागोवा घेतला. व विध्यार्थांनी उच्च शिक्षणाबरोबरच फार्मसीमधील विविध करीअरच्या संधीचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले

कार्यक्रमांचे प्रास्थाविक कॉलेजचे प्राचार्य. डॉ. रवींद्र भैरव कुंभार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन पिशवीकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. पियुषा नेजदार यांनी केल. तर कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक सुजित साळोखे, ग्रंथपाल वर्षा शिंदे, सीमा साळुंखे, अर्जुन चौगले यांनी केले. आभार अंजली पाटील या विध्यार्थिनीने मानले.

🤙 8080365706