
कोल्हापूर : ‘राष्ट्रवादीने कपटनीतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी,’ असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

येथे बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे कागल तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. आमदार प्रकाश आबिटकर, सुजित चव्हाण, वीरेंद्र मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.
”मी कितीकाळ पालकमंत्री पदावर राहीन माहिती नाही, पण येत्या सहा महिन्यांत कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन दाखवू. कोल्हापूरचे नाव भारतात प्रथम क्रमांकावर यावे, यासाठी पहिल्या दिवसापासून मी प्रयत्नशील आहे. असेही मंत्री केसरकर म्हणाले आहेत.
