
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या `परीक्षा पे चर्चा` अभियानांतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

परीक्षेच्या बाबतीत असलेली मनातील भिती आणि तणाव कसा घालवायाचा? याचे धडे देखील दानवे यांनी विद्यार्थ्यांना दिले.परीक्षा नुसता शब्द ऐकला तरी घाम फुटतो, हीच विद्यार्थ्यांच्या मनातली भीती आणि तणाव दूर करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ अभियानांतर्गत जालना येथील सरस्वती भूवन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवे यांनी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी आयोजित केलेले अभियान यशस्वी ठरत असून यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होतो आहे. या प्रसंगी सर्व मुलांना ‘ एक्झाम वाॅरियर्स` व `परीक्षा पे चर्चा या पुस्तिकेचे वितरण देखील करण्यात आले.
