
कोल्हापूर : ‘मातोश्री’शी नाळ जोडलेला खरा शिवसैनिक कोठेही गेलेला नाही.पैसा येतो- जातो पण निष्ठा कोठेही जात नसते. असे परखड मत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त शासकीय विश्रामधाम येथे आयोजित चर्चात्मक बैठकी प्रसंगी ते बोलत होते.या निमित्त शहरात विविध ठिकाणी फळवाटप, महाप्रसाद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,रिमांड होम बिस्कीट वाटप, रक्तदान शिबिर यांसारखे समाजोपयोगी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मा टॉकीज चौकात जयंती दिनी फोटोपूजन करण्यात येणार आहे.
त्यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याच्या सूचनाही यावेळी पवार यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत. यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
