
मुंबईः दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत परतले. विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यात महाराष्ट्राला काय मिळालं याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली.विमानतळावर उतरल्यानंतर हार, पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. दावोस येथील हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असून महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने जगभरातील देशांच्या प्रतिनिधींशी महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यात महाराष्ट्राला काय मिळालं याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये राज्याच्या वतीने मी उपस्थित होतो. उद्योगमंत्री आणि संबंधित विभागही होता. दावोस दौऱ्याबद्दल खूप आनंदी, समाधानी आहे. दौऱ्याचं फलित झालंय, ते यासाठी की राज्यासाठी 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयू झाले आहेत.
