चित्रा अशी कशी गं तू सास…; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल ऊर्फी जावेद यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच असून ऊर्फीने ट्विट करत, ‘उर्फी जावेदला दिला त्रास… चित्रा अशी कशी गं तू सास…’ असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांना अभिनेत्री उर्फी जावेदने डिवचलं आहे.

उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी अनेक ट्वीट केले होते.याच्या आधी देखील उर्फीने चित्रा यांचा उल्लेख माझी सासू म्हणून केला होता. तर कधी आम्ही चांगल्या मैत्रीण होऊ असं म्हटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. आताही तिने ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.