
आंबेगाव : आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली असून जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले.

पुणे जिल्ह्याच्या मंचर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मुख्य बाजार पेठेत नवजात स्री जातीचे अर्भक पिशवीत घालून कचऱ्याच्या कुंडीत फेकून देण्यात आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक तरुणांनी अर्भकाला रुग्णालयात नेलेकाही स्थानिक तरूणांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत मंचर पोलिसांना याची माहिती देण्यात आले. या बाळाची तब्बेत आता चांगली असून त्याच्यावर ग्रामीण रूग्नालयात उपचार सुरू आहेत.यानंतर मातेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बालिकेच्या आईला अटक केली आहे.
