‘न्यू पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित न्यू पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी मेळावा, ‘न्यूपोलियन्स २०२३’ भव्यदिव्य अशा स्वरूपात पार पडला.

यामध्ये जवळपास ६०० माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर, झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरज झंवर, घाटगे पाटील ग्रुपचे आदित्य पाटील, इंद्रप्रस्थ डेव्हलपर्सचे रविकिशोर माने आदींचा समावेश होता.स्नेहमेळाव्याचे समन्वयक प्रा. नितीन पाटील यांनी सांगितले की ‘१९८३ साली स्थापित न्यू पॉलिटेक्निकने आतापर्यंतच्या ३७ बॅचेसमधून तब्बल १२००० पेक्षा जास्त अभियंते घडविले आहेत, जे राष्ट्र उभारणीत आपला सहयोग देत आहेत. यामध्ये ३००० हून अधिक उद्योजक व व्यावसायिक, ५००० हून अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील अभियंते, १२०० हून अधिक एमएसईबी, पीडब्ल्यूडी, सिडको, पाटबंधारे, रेल्वे, आरटीओ, एमपीसीबी, एसटी अशा शासकीय व निमशासकीय खात्यांतील अभियंते यांचा समावेश आहे’.प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी मेळाव्याच्या प्रयोजनाचा हेतू स्पष्ट केला. ‘विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण व्हावी, एकमेकांच्या प्रगतीसाठी हातभार लागावा, न्यू पॉलिटेक्निकशी असलेली त्यांची नाळ कायमच जुळती रहावी, त्यांच्या ज्ञान, अनुभव व कौशल्याचा फायदा सद्ध्या शिकणाऱ्या मुलांना व्हावा, तेही तितकेच दर्जेदार अभियंते घडावेत’. ते म्हणाले की ‘बरेचसे माजी विद्यार्थी तीव्र इच्छा असुनही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत.’संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे म्हणाले की ‘संस्थेने १९८३ साली लावलेल्या न्यू पॉलिटेक्निक या रोपट्याचा आता एक विशाल वृक्ष झाला आहे, ज्याची फळे भारत व भारताबाहेरही पसरलेली आहेत. सुरूवातीस इथे तीन कोर्सेस होते, तर सद्ध्या सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्राॅनिक्स काॅम्प्युटर आणि एआयएमएल हे सहा कोर्सेस शिकवले जातात.

‘कार्यक्रमास विशेष उपस्थित उचगांवचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले की, ‘उचगांव व आजुबाजुच्या गावांतील कित्येक मुले न्यू पॉलिटेक्निकमधून अभियंता म्हणून घडलेली आहेत. न्यू पॉलिटेक्निक व संस्थेस आमचे कायमच सहकार्य राहील.

यावेळी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, हुतात्मा उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी, संचालिका सौ. सविता पाटील, संचालक आर. डी. पाटील, पी. सी. पाटील आणि न्यू पॉलिटेक्निकचे आजी माजी स्टाफ उपस्थित होते.

🤙 8080365706