सत्तांतर नाट्य कसे घडले ? गिरीश महाजन यांनी केला खुलासा

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी सत्तांतर नाट्य कसे घडले याची माहितीच महाजन यांनी दिली.

तशी लाट आली नाही, त्या लाटेनं शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदावरच बसवलं. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सारखं काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे अजिबात झोपत नाही.रात्री सुद्धा ते लोकांच्या भेटी घेत असतात. आधीचे मुख्यमंत्री हे घरी बसून काम करतो, मंत्रालयाची पायरी सुद्धा चढले नाही. आमचा मुख्यमंत्री पाहा, खरा आमचा जानता राजा आहे, खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहे.सगळे प्रलंबित काम करत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. 

🤙 8080365706