मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित….

मुंबई: मुंबई विमानतळावरही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी दोन प्रवाशी BQ.1.1 या सब व्हेरियंटने बाधित असल्याचं समोर आलेय.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत परदेशातून आलेले नऊ प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BQ 1.1 या सब व्हेरियंटचे रुग्ण आहेत. तर इतर सात जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनंतर 24 डिसेंबरपासून आरटीपीसीआर कोरोना चाचणी परदेशातून आलेल्या नागरिकांची केली जात आहे. मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशातील नागरिकांपैकी आतापर्यंत नऊ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळे आहेत. यातील एक 16 वर्षीय लंडनहून आलेला पुरुष प्रवासी आणि स्विझर्लंडवरून आलेली पंचवीस वर्षे महिला प्रवासी या दोघांमध्ये ओमायक्रॉन BQ.1.1 व्हेरियंट आढळला आहे.

🤙 8080365706