पुण्यात 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बोगस ….

पुणे : शिक्षण क्षेत्रात आणखीन एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

या तिन्ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अजूनही जिल्ह्यातील काही  शाळांमध्ये  बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

बोगस शाळा कोणत्या? एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे.

🤙 8080365706