
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अपघात विमा पॉलिसी प्रत्येकी ५ लाखांचा काढण्यात आला.

ही पॉलिसी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २० हुन अधिक पत्रकारांना शुक्रवारी काढून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.दिवसरात्र समाजाच्या घडामोडी टिपण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून अपेक्षित लाभ मिळत नाही, त्यात अपघात झाला तर आर्थिक मदतीची टंचाई होती, लोकांना मदत मिळवून देणारा पत्रकार मात्र अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहतो ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका कडून प्रत्येकी ५ लाखांचे पॉलिसी काढून देण्यात आले. आज पत्रकार विविध अडचणीत असतानाही समाज जनजागृती व समाजाच्या जडणघडणीत देत असतो, अशा सर्व पत्रकारांना अपघात विमा पॉलिसी मिळावी म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.
