
मुंबई : रविवारी म्हणजे 8 जानेवारीला तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी रविवारी 8 जानेवारीला हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

रविवारी म्हणजे 8 जानेवारीला तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी रविवारी 8 जानेवारीला हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.०४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
