कोल्हापुरात रंगणार राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा…

कोल्हापूर : महाराष्ट्र रिक्षा चालक सेना प्रणित निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे २६ जानेवारीला राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.

शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथे सकाळी दहा वाजता ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा रिक्षा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. जाधव म्हणाले, ”स्पर्धा २०१९ ते २०२२ व २०१९ च्या आतील सर्व जुन्या रिक्षांसाठी ‘अ’ गट व ‘ब’ गटात होतील. दोन्ही गटांतील विजेत्या स्पर्धकातून दोन रिक्षा निवडून एकास ‘महाराष्ट्र रिक्षा सुंदरी’ चांदीचे मेडल, मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येईल. दुसऱ्या रिक्षास ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ सन्मानचिन्ह, मानाचा फेटा देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेवेळी दोन चाकावर रिक्षा चालवणे, रिव्हर्स रिक्षा चालवणे याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. या वेळी प्रामाणिक रिक्षा चालकांचा सत्कार होणार असून स्पर्धेत अनुक्रमे तीन पारितोषिकासह उत्तेजनार्थ क्रमांक दिला जाणार आहे.

🤙 8080365706