
आरोग्य टिप्स: लहान मुलांमध्ये स्थुलता वाढू लागली असून मैदानी खेळ न खेळल्याने मुलांच्या हाडांना हवी तशी बळकटी मिळत नाहीये म्हणूनच त्यासाठी आता जाणून घेऊया पालकांनीच मुलांच्या हाडांना बळकटी मिळण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजेत?

व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषले जावे, हाडांना बळकटी मिळावी यासाठी व्हिटॅमिन डी अतिशय गरजेचे आहे. पण बहुतांश लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्येही व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसते. त्यामुळे मुले दिवसातून किमान १० ते १५ मिनिटे तरी कोवळ्या सुर्यप्रकाशात बसतील, एवढी काळजी पालकांनी घ्यावी. यावेळी मुलांच्या हाता- पायांना, चेहऱ्याला ऊन लागले पाहिजे.कॅल्शियम मुलांना आहारातून योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळाले पाहिजे. यासाठी त्यांनी नियमितपणे दूध, चीज, दही, पालक, सोयाबीन, भेंडी खायला पाहिजे. मोसंबी हा देखील कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम हे दोन पदार्थ आणि कॅल्शियम जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते हाडांसाठी उत्तम टॉनिक ठरतात. त्यामुळे व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम देणारे अन्नपदार्थ उदा.- पालक, कोबी, हिरव्या शेंगा आहारात असायला पाहिजेत. व्यायामाची सवय लावा टीव्ही, माेबाईल बघत एकाच जागी तासनतास बसून राहण्याची मुलांची सवय अतिशय घातक आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. सायकलिंग, रनिंग, स्विमिंग किंवा बॅडमिंटनसारखा एखादा खेळ त्यांनी खेळायलाच हवा, याकडे लक्ष द्या.
