ऑल इंडिया ज्वेलर्स ऍंड गोल्डस्मिथ फेडरेशन संयोजकपदी नचिकेत भुर्के

कोल्हापूर : ऑल इंडिया ज्वेलर्स ऍंड गोल्डस्मिथ ही संस्था भारतातील सर्वात मोठी व्यापारी असोसिएशन काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या ज्वेलरी विंगची राष्ट्रीय पातळीवरील रीटेल ज्वेलर्स, गोल्ड स्मिथ व चांदी कारागीर यांचे प्रतिनिधित्व करणारी असोसिएशन आहे. या संस्थेच्या संयोजकपदी नचिकेत भुरके यांची निवड झाली आहे.

केंद्र सरकारच्या रीटेल व्यवसायिक धोरणासंदर्भात निर्णय घेणार्या विविध केंद्रीय समित्यांवर असोसिएशन प्रतिनिधित्व करत आहे. भारतातील ज्वेलर्सचे प्रतिनिधित्व करणारी केंद्र सरकारची जी कोअर कमिटी आहे, त्या कमिटीच्या नॅशनल बाॅडीमध्येही AIGJF चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना मानाचे स्थान आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल ज्वेलरी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील विविध धोरणे ठरविण्यासाठी AIGJF च्या पदाधिकारी बरोबर चर्चा करत असतात., यातुनच या संघटनेचे महत्व विशद होते.

नचिकेत रविंद्र भुर्के यांचे ज्वेलरी क्षेत्रातील भरीव कार्य व त्यांची या क्षेत्रातील टेक्निकल परीपुर्णता व सर्व सामान्य ज्वेलर्स व कारागीर यांचे प्रती असलेली सामाजिक बांधिलकी या सर्व बाबींचा विचार करुन अशा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात स्ट्राॅंग नेटवर्क असलेल्या असोसिएशन मधे पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. यासाठी त्यांना AIGJF चे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा, राष्ट्रीय संघटन मंत्री मणींद्रनाथ सोनी व महाराष्ट्र राज्य संयोजक राजकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण या झोनमधील ८ जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी नचिकेत भुर्के यांच्यावर देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रा मधे ज्वेलरी क्षेत्रामधे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने भुर्के यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

🤙 8080365706