
कोल्हापूर : मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. या दिवशी संपूर्ण भारतात पतंग उडवले जातात. पण जर तुम्हाला खरोखरंच पतंग उडवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही परवानगीशिवाय पतंग उडवत असाल, तर तो कायदेशीर गुन्हा आहे.

परमिटशिवाय पतंग उडवणं हा भारतीय विमान कायदा 1934 नुसार गुन्हा आहे. 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय विमान कायदा 1934 नुसार, जर कोणीही आकाशात पतंग, फुगा किंवा ड्रोनसारखं काही उडवत असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी किंवा परवाना घेणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही पतंग उडवला असेल आणि तो एखाद्या विमानासारखा उडवला गेला असेल, ज्यामुळे जमिनीवर, आकाशात किंवा हवेत जीवित, मालमत्तेची हानी होऊ शकते, असं सिद्ध झालं, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल, तर या कायद्यानुसार शिक्षा होईल.
