
मुंबई : नोटाबंदीचा निर्णय वैध आहे, असे सांगणे म्हणजे देशातील आर्थिक हत्याकांडाचे समर्थन करणे असेच आहे; पण आता देशाच्या जनतेलाही ”यस, मिलॉर्ड! नोटाबंदीबाबत पंतप्रधान मोदींचे व आता तुमचे बरोबर आहे,” असे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापुढे मान झुकवावी लागणार आहे, असं म्हणत शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला आहे.

नोटाबंदीचा मोदी सरकारचा निर्णय योग्यच होता, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारचे अवैध, बेकायदेशीर निर्णय वैध ठरविण्यासाठी आपली न्यायालये निर्माण झालेली नाहीत.राफेल घोटाळय़ाचे सर्व पुरावे समोर येऊनही सर्वोच्च न्यायालयाने हा व्यवहार वैध ठरवला. पेगॅसस हेरगिरी प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयास काहीच चुकीचे आढळले नाही व आता नोटाबंदीही योग्यच होती, असे घटनापीठाने जाहीर केले.
