
फूड टिप्स: काही जण डायटमध्ये दिवस रात्र फळ खात आहे. मात्र, फळे खाण्याची देखील योग्य काळवेळ असते. प्रत्येक फळात विविध गुणधर्म असतात. जे योग्यवेळी खाल्ल्याने त्याचे पौष्टीक तत्वे शरीराला लागतात.

रात्री फळे खाल्ल्यानंतर पोटाची भूक भागत नाही. अशाने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाही. पुरेसे प्रोटीन शरीराला न मिळाल्याने शरीर कमजोर बनते. निरोगी चरबीचे सेवन न केल्यामुळे, सांधे निरोगी ठेवण्यास आणि हार्मोनल कार्य सुधारण्यात अडचण येते. केवळ फळांपासून पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि केस गळायला लागतात. इतकेच नाही तर याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि निर्जीव बनू लागते.यासंदर्भात पोषणतज्ञ जुही कपूरने सांगितलं की, ”रात्रीचे जेवण संतुलित असावे. आपले पूर्वजही असाच आहार पाळत असत. रात्रीच्या वेळी पारंपारिक जेवण फायदेशीर ठरते. फळांबद्दल सांगायचे तर, फळे अन्न म्हणून आपण खाऊ नाही शकत. ते मुख्य जेवण नाही. त्यामुळे ते टाळले पाहिजे आणि रात्रीच्या वेळी इतर पर्यायांकडे लक्ष दिले पाहिजे. फूड टिप्स: काही जण डायटमध्ये दिवस रात्र फळ खात आहे. मात्र, फळे खाण्याची देखील योग्य काळवेळ असते. प्रत्येक फळात विविध गुणधर्म असतात. जे योग्यवेळी खाल्ल्याने त्याचे पौष्टीक तत्वे शरीराला लागतात.
