उजनीतील पाण्याचा रंग बदलला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुणे ; पुणे जिल्ह्यासह सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचं शैवाल तसेच केमिकल मिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या पाण्याला हिरवा रंग आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेती पिकाची उत्पादकता देखील घटली आहे. मनुष्यासह पशुधन धोक्यात आले आहे. या पाण्यावर अनेक संशोधने झाली, यात हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचं या संशोधनातून पुढे आलं, पण उजनीच्या पाण्यावरती शासनाने काहीच उपायोजना न केल्याने आता उजनी धरणाचे पाणी दुर्गंधीयुक्त आणि या पाण्याचा रंग चक्क हिरवा बनत चाललेला आहे. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील गावात या पाण्याचा दुर्गंधी युक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी इतके दुशीत झाले आहे की, त्याचा इतर कामांसाठी देखील वापर होऊ शकत नाही. अनेक नागरिक हे पाणी विषारी झाल्याचे म्हणत आहेत.उजनी धरणाच्या शेजारी अनेक कंपन्या उभ्या आहेत. राजकीय नेत्यांनी विकासाच्या नावाखाली या कंपन्या इथे उभारल्यात. यातील खराब पाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ थेट पाण्यात सोडले जात आहेत. आता पर्यंत हे पाणी शुद्ध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. मात्र कंपन्या शासकीय यंत्रणेला हाताशी धरून पाणी शुद्ध करण्याऐवजी ते साठवून ठेवत आहेत. पावसाच्या दिवसांत हे पाणी नाल्यात सोडले जात आहे. असे निदर्शनास आल्याचे स्थानीक नागरिकांचे म्हणणे आहे.

🤙 8080365706