
कागल : कागल चा आठवडी बाजार खर्डेकर चौक ते गैबी चौक या मूळ ठिकाणी भरवा अशी मागणी भाजीपाला विक्रेते व व्यापारी लोकांची आहे.यावर व्यापारी, पोलीस व नगरपालिका प्रशासन यांच्याशी चर्चा करून समन्वयाने योग्य तोडगा काढून बाजार मूळ ठिकाणी भरवू असे ठोस आश्र्वासन भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिले.

कागल शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार हा खर्डेकर चौक ते बापूसाहेब महाराज चौकपर्यंत व्यापारी, दुकानदार आणि फेरीवाले यांच्यातील सामंजस्याने भरत होता. तो ग्राहकांनाही सोयीचा होता. पण ही बाजारपेठच निपाणी वेशीबाहेर भरवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला.व त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र त्यास ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याचा फटका व्यापारी वर्गाला बसला. त्यामुळे अनेक व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. व्यापाऱ्यांनी पूर्ववत जुन्या बाजारपेठेत व्यापार सुरू केला. मात्र त्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा दिला होता.
याबाबतची कैफियत व्यापारी असोसिएशनने श्री घाटगे यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार घाटगे यांनी थेट गैबी चौक ते खर्डेकर चौक परीसराची रस्त्यावर उतरून पाहणी केली.भाजीपाला विक्रेते व्यापारी व ग्राहकांशी संवाद साधला.यावेळी घाडगे म्हणाले, कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांसह सर्वानाच फटका बसला आहे, त्यातच कागलमधील बापूसाहेब महाराज या मूळ बाजारची जागा बदलल्यामुळे व्यापाऱ्यांना फटका बसला .त्यामुळे ग्राहकांची ही गैरसोय होत होती. या दोन्ही वर्गाच्या आग्रही मागणीमुळे प्रशासन व व्यापारी यांच्यात समन्वय साधून शिस्तबद्धरित्या बाजार मूळ ठिकाणी भरवू. ते पुढे म्हणाले,यामुळे वाहतूक कोंडी होऊन ट्राफिक ज्याम होईल इतकीच अडचण आहे.यावर उपाय म्हणून बाजाराच्या दिवशी खर्डेकर चौक व निपाणी वेस येथे बॅरिगेट लावून मोठ्या वाहनाना बंदी घालता येईल का? टू व्हीलर व फोर व्हीलर चे स्वतंत्र पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करता येईल का ते पाहूयावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत तीरावडे, मुख्याधिकारी श्रीराम पोवार यांचेसह योगेश गाताडे प्रकाश बोभाटे समीर मुरगुडे, रणजीत पाटील, सुरज अथणे ,महेश अथणे, इंदुमती कदम, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी,माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी आनंदा पसारे शाहूचे संचालक सतीश पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
नगरपालिका प्रशासनाने आराखाडा तयार करावा
बाजाराच्या दिवशी भाजीपाला विक्रेते व इतर घाऊक व्यापारी योग्य ठिकाणी बसतील याबाबतचा आराखडा नगरपालिका प्रशासनाने तयार करावा जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही. अशा पद्धतीने बैठक व्यवस्था करावी. तसेच पोलीस यंत्रणेने विभाग वाईज पार्किंगचे नियोजन ही करावे अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
