
कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरनेइंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील भालाफेक तसेच उंच उडी क्रीडा प्रकरात उत्तुंग यश संपादन केले.

रामचंद्र पॉलीटेक्निक पुणे येथे संपन्न झालेल्या भालाफेक किडा प्रकारात महाविघालयातील कुमार आयुष विनोद पाटील दितीय वष संगणक विभाग याने 45.90 मीटर भालाफेक करून राज्यात प्रथम क्रमांक संपादन केले.
तसेच विखे पाटील पॉलिटेक्निक लोणी अहमदनगर येथे झालेल्या येथे मुलींच्या पार पडलेल्या राज्यसरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील उंच उडी या प्रकारांमध्ये कुमार हिना आयुब मुजावर प्रथम वर्ष संगणक विभाग राज्यसरीय विजेतैपद पटकावले सदर विजेत्या खेळाडूने क्रीडा संचालक लालासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले सदर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मा डॉक्टर एच एम कदम मानसंचालक भारती विद्यापीठ पुणे विभागीय कार्यालय सांगली महाविघालयाचे प्राचाय श्री एम एस देशमुख तसेच शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी अभिनंदन केले.