आनंदाची बातमी: ५०० रुपयात मिळणार गॅस सिलेंडर

मुंबई : सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी. बीपीएल आणि उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या नागरिकांना 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे.

1 एप्रिलपासून नव्या दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वर्षी उज्ज्वला योजनेतंर्गत 500 रुपये दराने 12 सिलेंडर कुटुंबाला मिळतील. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका जाहीर सभेत बोलताना ही घोषणा केली. राज्याच्या आगामी अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा महागाईचा भार कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील किट वाटपाची योजना आणण्याचंही अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर पुरवण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ सुरु केली.

🤙 9921334545