
गरिबांच्या घराला भाजपाने बांधले लोकनियुक्त सरपंच पदाचउमेदवारीच कमळाचे तोरण
उचगाव : लोकांनी वर्गणी काढून त्याला सतीश मर्दाने तुम्ही निवडणुक जिंकायचीच म्हणून अबकी बार उचगाव मध्ये भाजपाच सतीश सरकार सरपंच…अस म्हणत उभ केलं आहे.
धूरान माखलेले कौलारू घर, मातीच्या क्षीणविक्षिनं जीर्ण भिंती, मोडकळीस आलेली दाराची चौकट, शाडू च्या मातीन सारवलेल्या भिंती आणि शेणाने सारवलेली जमिन , मोडकळीस आलेल्या तुळया, बडोदे, त्याला टेकू लावला आहे. चुलीच्या धुराने काळ्या कुठ झालेले घराचे वासे, भितीना पोखरून केलेल्या दिवळ्या आहेत.शाडूने सारवलेल्या भिंतीवर सतीश हे शिवछत्रपती महाराज यांच्या विचारांवर माणसे माणुकीच्या नात्याने माणसे जोडत जीवन जगणारा गावातील गरीब तरुण व्यक्तीच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेकाची मोठी तस्वीर आणि फोटोच्या खाली छोट्याश्या देवळीत श्री. गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. गोणपाटाची ताडपत्री आणि पळसाच्या तीन पानानी जोडलेल्या पत्रावळीच्या पानाचे त्रोन व आकर्षक आरास हे बघून मन भरून यावं अशी ही भाजपा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवत असलेल्या उचगावच्या श्री. सतीश बाळकृष्ण मर्दाने या गरीबीत जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याची धन दौलत बघता क्षणी नजर खेळून राहते. वीज मीटर ही धुराच्या काळया कुट्ट काळोखात झाकले आहे. देवा घरी गेलेल्या आजोबा- आजी, वडील, आईची तस्वीर लावलेली आहे.भिंतीतील चोकोनी देवळीत देवारा अगदी दर्शन घेण्यासारखाच आहे. या हालाखीच्या परिस्थितीत दोन वेळच्या भाकरी साठी श्री मंगोबा देवालय परिसरात केस कटिंग चे छोटे दुकान चालवून भाऊ, पत्नी, मुलांचा सांभाळ करत जीवन जगत आहे. बारा बलुतदार असलेल्या ओबीसी नाभिक समाजाच्या पोराचे कौलारू घर बघितले की पडक्या भिंती केव्हाच निखळून खाली येतील याचा नेम नाही. पावसाळ्यात तर घरात पाणी येते. पावसाळ्यात घराला कुलूप लावून भाड्याने खोली घेऊन बिऱ्हाड पाठीवर घेऊन जावे लागते. अशी ह्या गरीब पणकायम सामाजिक भान ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची कहाणी आहे. भाजपाचा कार्यकर्ता म्हणून तो उचगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बॅट हे चिन्ह घेऊन लोकनियुक्त सरपंच पदासाठी थेट निवडणूक लढवत आहे.तर इतर उभारलेले बरेच उमेदवार आर्थिक परिस्थिती सुदृढ असणारे आहेत ही लढत नुसती राजकीय नसून आर्थिक श्रीमंत लोक विरुद्ध गरीब विश्वास देणारे लोक अशी गावात चर्चा सुरू आहे तुमचा विश्वास बसणार नाही.. पण हे वास्तव सत्य आहे. होय भाजपा प्रणित उचगाव ग्रामविकास आघाडी ने या निवडणुकीत एका अतिसामान्य केस कटिंग चालवून पोटाची खळगी भरण्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या युवकानं अभ्यासु स्वभाव असल्याने चिकाटीने MA चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्याची गावासाठी विकास कामे करण्याची चाललेली तळमळ बघून गावातील अनेकांनी आपल्या परीने वर्गणी गोळा करून त्याच्या ओंजलित टाकली आहे.
मनमिळाऊ स्वभावामुळे मोल मजुरी करणाऱ्या, हमाल, रिक्षा चालक, पान टपरी, हॉटेल मधील कामगार, महिला बचत गट, शेतात खुरपणी करणाऱ्या रोजदारी महिलांनी पदराला बांधलेली छोटी मदत त्याच्या हाती दिली आहे. आणि त्यांना भरभरून साथ देण्याच वचनही त्या माताभगिनी दिलं. लोकांनी वर्गणी काढून त्याला सतीश मर्दाने तुम्ही निवडणुक जिंकायचीच म्हणून अबकी बार उचगाव मध्ये भाजपाच सतीश सरकार सरपंच. .. अस म्हणत उभ केलं आहे.
श्री सतीश बाळकृष्ण मर्दाने या युवा कार्यकर्त्यांला भाजपा कार्यकर्त्यांनी पाठबळ दिलं आहे. भाजपा प्रणित च्या पूर्ण पनेल मध्ये कष्ट करी, शेतकरी कुटुंबातील ज्यांना राज्यकिय वारसा नाही त्यांना उभ केलं आहे. ही सर्वजण नव्या उमेदीने भविष्यात समाजकार्य करण्याच्या आवडीने निवडणुकीच्या आखाड्यातउभे आहेत. श्री सतीश बाळकृष्ण मर्दाने या ओबीसी समाजातील कार्यकर्त्याने भविष्यात विकासासाठी गावाला पूर्ण न्याय देण्याची शपथ घेऊन पायाला भिंगरी बांधून डोअर टू डोअर जनमत मिळवत आहेप्रचार यंत्रणा राबिवली आहे. त्याला युवा वर्गाचा, ज्येष्ठांचा, महिला युवतीचा पाठींबा मिळत आहे. या पट्ट्याने सारा गाव हिंडून फिरून पालती घातला आहे. सकाळी सहा वाजल्या पासून रात्री बारा वाजेपर्यंत तो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पॅनेलच्या सहकार्य बरोबर प्रचार करण्यास जात आहे. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकारी, पॅनल मधील,गावातील ज्येष्ठांकडून त्यास मार्गदर्शन केले जात आहे. युवकांनी तर त्याची उमेदवारी उंचगावकराणी डोक्यावर ,मनापासून उचलून घेतली आहे. आता नाही तर कधीच नाही असा गावकऱ्यांनी चंग बांधला आहे. त्याचे निवडणूक चिन्ह बँट आहे. तो या निवडणुकीत सर्व सहकारी उमेदवारासह सिक्सर मारणार आहे.लोकाचे केस कटिंग करता करता त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव सर्वाना आवडत असून निवडणुकीही मात्र विरोधकांच्या मताचे कटिंग करून नक्कीच निवडुन येऊन तो ग्रामपंचायत चा स्वच्छ कारभार नक्की करणार आहे याची खात्री होत आहे.जय हो… उचगाव नेहमीच अनाथाचे नाथ झाले आहे. एखाद्या उमेदवाराला वर्गणी काढून उभ केलं असेल तर त्याचा विजय नक्की असतो कारण तो जनतेचा ,ईश्वराचा आशीर्वाद समजला जातो आणि हेच मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे.. आता भाजपाच केंद्रात, राज्यात सरकार असल्याने ,ग्रामपंचायत मार्फत गावात निधी लवकर उपलब्धता होऊन गाव विकासाच्या पटलावर उमटून दिसण्यासाठी येथे सत्ता खेचून आणून एका गरिबाला न्याय देत उंचगाव मध्ये राजकीय परिवर्तन नक्की करणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारणार आहे जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
