
नाशिक : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे विरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये दिंडी यात्रा काढली आहे. सुषमा अंधारे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्याची मागणी दिंडीतील वारकर्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहे. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे.
राज्यभरातून वारकरी संप्रदाय निषेद आंदोलने केली जात आहेत. आळंदीमध्ये तर प्रेतयात्रा काढून वारकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते. या दिंडीच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात येत आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरापासून युवा यात्रेला प्रारंभ झाला असून गोदावरी पटांगणावर रामकुंडानजीक या यात्रेचा समारोप होणार आहे.
