अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई : राज्य सरकरने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे.

तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर एवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

🤙 8080365706