डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 21 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 21 मजली भव्य इमारतीचे भूमिपूजन डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ साकारत असून कोल्हापूरमधील ही सर्वात उंच इमारत ठरणार आहे. ब्रह्म वृदांच्या मंत्रघोषात होम हवनासह विविध धार्मिक विधीसह हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. विश्वस्त पृथ्वीराज पाटील व सौ. वृषाली पाटील यांच्याहस्ते पूजा व धार्मिक विधी सपन्न झाले. यावेळी डॉ. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वैयजंती संजय पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, शांतिनिकेतनच्या संचालिका सौ. राजश्री काकडे, मेघराज काकडे, करण काकडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डी. वाय. पाटील शिक्षण एज्युकेशन सोसायटीच्यावतीने 1989 ला वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2003 मध्ये कदमवाडी येथे 750 बेड चे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्यात आले. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यत लाखो लोकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर यांचे आयोजन केले जात आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात , त्याचबरोबर हॉस्पिटलशी त्यांचा सततचा संपर्क राहावा या उद्देशाने हॉस्पिटलच्या परिसरामध्ये ही 21 मजली भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतुन ही सुसज्ज भव्य इमारत साकारत आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. विविध क्लासरूम, विद्यार्थी वसतीगृह, ग्रंथालय, विविध लॅब, पार्किंग आदी अत्याधुनिक सुविधा या प्रशस्त इमारतीमध्ये उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर के. मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के प्रथापन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ जे. ए. खोत, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ आर के शर्मा, वैद्यकीय अधिक्षिका डॉ वैशाली गायकवाड, सहाय्यक कुलसचिव संजय जाधव, अजित पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुप मधील विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.फोटो ओळीकदमवाडी: डी वाय पाटील मेडीकल कॉलेजच्या नव्या भव्य इमारतीचे भूमिपूजन करताना पद्मश्री डॉ डी वाय पाटील व सौ शांतदेवी डी पाटील. समवेत डॉ. संजय डी.पाटील, सौ वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, सौ पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पाटील, राजश्रीताई काकडे, मेघराज काकडे, करण काकडे.

🤙 8080365706