
नवी दिल्ली : क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. असं म्हणत नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगितला.

ते एकदा ब्रेबॉर्न स्डेडियमवर प्रमोद महाजन यांच्यासह मॅच बघायला गेले होते. चहापानापर्यंत भारताच्या विकेट्स पडत होत्या. त्यावेळी भाजपा नुकतीच निवडणूक हरली होती.हा किस्सा सांगताना ते म्हणाले की, ते तेव्हा तरुण होते. त्यावेळी प्रमोद महाजन मध्येच उठून त्यांना म्हणाले की ‘मी घरी जातो. मी जिथे जातो, तिथे पराभवच होतो. आता भारत हरतोय. त्यामुळे मी निघून जातो’. आम्ही तिकीट घेतलं होतं. तर आम्ही म्हणालो की ‘तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, आम्ही पूर्ण सामना पाहणार’. तुम्हाला विश्वास बसणार नाही की ते जसे गेले, सामना फिरला आणि भारत जिंकला. कोण का जिंकला आणि कोण का हरला हे समजत नाही. ही मायबाप जनता आहे. त्यांचा अधिकार आहे. जनता जो निर्णय देईल तो स्वीकारावा लागतो”, असं गडकरी यावेळी म्हणाले.दरम्यान, यावेळी भाजपा आक्रमक धोरण का अवलंबून आहे? यासंदर्भात विचारणा केली असता गडकरींनी त्यावर उत्तर दिलं. “माध्यमं डबल ढोलकीसारखी वागतात. जर नेते कन्स्ट्रक्टिव्ह बोलले, तर तुम्ही म्हणता की विरोधकांमध्ये दम नाही. जास्त आक्रमक झाले, तर तुम्ही म्हणता विरोधक बेजबाबदार आहेत. दोन्ही बाजूंनी वाजवणारे इतके आहेत, की त्यामुळे समस्या येते. त्याला काय करणार? हळूहळू आपल्या लोकशाहीमध्ये संवेदनशील बनताना आपण प्रगल्भ होत कामगिरीच्या आधारावर समोरच्याला जोखायला हवं. कामगिरीचं परीक्षण व्हायला हवं”, असं ते म्हणाले.
