ई-स्टोअर इंडिया देणार २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान परतावा- सीएमडी फैजान खान

कोल्हापूर : गेली साडेचार वर्ष ई- स्टोअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना आयुर्वेदिक औषधे किराणा , व्यवसाय व रोजगाराची संधी निर्माण करून दिले आहे .काही तांत्रिक व स्पर्धात्मक अडचणीमुळे सभासदांचे गेले काही महिने परतावे मिळालेले नाहीत. तरी सर्व सभासदांचे परतावे येत्या २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सुरू होतील असे आश्वासन कंपनीचे सीएमडी फैजान खान दिले आहे.

सभासदांच्या अडचणी लक्षात घेऊन कंपनीने हाँगकाँग स्थित अँक्रेडिया कंपनीबरोबर भागीदारी केली आहे .या भागीदारीपोटी पंधराशे कोटी रुपये इंटरनॅशनल फंड उपलब्ध होत आहे .यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करून सर्व बाबींची पूर्तता होत आहे. कंपनी नव्या जोमाने पुन्हा व्यवसायात उतरली असून कंपनीने दिल्ली, गारगोटी, सावंतवाडी, हैदराबाद ,मिजोराम या ठिकाणी करोडो रुपयांचे मार्केट ग्राहकांना खरेदीसाठी खुले केलेले आहेत . सभासदांना खरेदी वरती ४ ते ४० टक्के सूट देण्यात येत आहे .ई स्टोअर इंडिया कंपनी नव्या जोमाने सुरू झाली असून सभासदांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता कंपनीसोबत रहावे तसेच संयम राखून सहकार्य करावे .सर्व सभासदांचे परतावे येत्या २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सुरू होतील असे आश्वासन कंपनीचे सीएमडी फैजान खान दिले आहे.

🤙 8080365706