
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. या महामानवाला विनम्र अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत.इतकच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाविषयीच्य जाणून घेऊया.डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाबासाहेबांना एकूण 13 भावंडे होती. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ सुभेदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांचे गुरू आणि शिक्षकांनी प्रेमाने त्यांचे आडनाव बदलून ‘आंबेडकर’ ठेवले.वयाच्या 15 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाई यांच्यासोबत झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935-36 मध्ये ‘वेटिंग फॉर अ व्हिसाचे’ नावाचे 20 पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हस्तलिखित पूर्ण केले. आंबेडकरांना मधुमेहाचा गंभीर आजार होता. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.
