शहरातील बांधकाम अडचणी संदर्भात आयुक्तांची क्रिडाई बरोबर बैठक

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांना बांधकाम संबधित योणाऱ्या अडचणी संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महानगरपालिकेच्या स्थायी कमिटी हॉल येथे बैठक घेतली.

यावेळी घरफाळा,नगररचना विभागातील असणारा अपुरा कमर्चारी व त्याच्या उपस्थिती बाबत ,ऑनलाइन बिल्डिंग परमिशन,फायर नाहरकत दाखला,घरफाळा नाहरकत दाखला, वॉटर सप्लाय ना हरकत दाखला,ड्रेनेज नाहरकत दाखला, इनाम जमिनीचे लेआऊट डेमाक्रेशन चे रेखांकनास मंजुरी, टी.डी.आर. युटीलायझेशन तसेच वृक्ष समिती, तिसरा विकास आराखडा या मुद्यावरती सविस्तर चर्चा झाली. क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व पदाधिकारी यांनी बांधकाम परवानगी मध्ये सुसूत्रता येण्यासाठी व मोठ्या बांधकामाच्या ऑनलाईन परवानग्या वेळेत मिळाव्यात या साठी तज्ञ अधिकाऱ्याची व कर्मचारी याची नियुक्ती करावी. तसेच नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुपारच्या सत्रात कार्यालयात थांबणे बंधनकारक करण्यात यावे.बांधकाम परवानगीसाठी लागणारे विविध नाहरकत दाखले त्वरित मिळावेत. अशा विविध मागण्या मांडल्या. या वेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपिस्थत असलेल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर कामे वेळेत निर्गत करण्याचेआदेश दिले व याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला उपायुक्त शिल्पा दरेकर,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत,सहायक रचनाकार रामचंद्र महाजन उपशहर रचनाकार रमेश मस्कर,जल अभियंता हर्षजीत घाटगे,चीफ फायर ऑफिसर तानाजी कवाळे,उद्यान अधीक्षक समीर व्याघ्यांबरे,तसेच क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव प्रदिप भारमल,खजानीस गौतम परमार,सह सचिव श्रीधर कुलकर्णी ,निखिल शाह,सह खजाणीस पवन जामदार,संचालक के.पी.खोत,श्रेयांश मगदूम,संदीप मिरजकर,अजय डोईजड, महेश पोवार,गणेश सावंत, लक्ष्मीकांत चौगुले,श्रीराम पाटील, तसेच सभासद महेश यादव,सत्यजित कदम,विलास रेडेकर व मोठ्या संख्येने सभासद हजर होते.

🤙 8080365706