मुंबईमध्ये भीषण आग ; अंगावर शहारे आणणारी घटना आली समोर

मुंबई : मुंबईमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. मालाड परिसरात एका इमारतीत घराला आग लागली आहे. या घटनेला अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

जीव वाचवण्यासाठी एका तरुणाने इमारतीच्या बाल्कनीमधून उडी मारली आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरातील जन कल्याण नगर परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. इमारतीतील एका फ्लॅटला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत.पण ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकते नाही.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एका महिलेचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. फ्लॅटला आग लागल्यानंतर ही महिला इमारतीच्या बाल्कनीमध्ये येऊन कठड्यावर बसली होती.पण आग जास्तच पसरत चालली होती. या महिलेला खाली उतरण्यासाठी शिडी लावण्यात आली होती. त्यावरून तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला पण काही कळायच्या आता या महिलेनं खाली उडी मारली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

🤙 8080365706