मराठवाड्यातील 25 गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा इशारा

सांगली : मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याचा इशारा देत आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत या गावातील जनतेत आहे.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या ४८ गावांनी पाणी प्रश्नावरून थेट कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला होता. यानंतर सीमाभागातील गावांमध्ये अस्वस्थता असून अनेक गावांतून असे इशारे दिले जात आहेत.कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला असताना आता हो लोण मराठवाड्यापर्यंत पोहचले आहे.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही सीमावादाचे लोण पसरले आहे. सीमेवरील धर्माबाद तालुक्यात असलेल्या २५ गावांनी आता तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिला आहे. प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यात होता.या गावाचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांची एक बैठक नुसतीच बासर येथे झाली.नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलूरकर आणि किनवट तालुक्यात सीमाभागात असलेली २५ गावे तेलंगण राज्यात सामील होण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

🤙 8080365706