ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची राज ठाकरेंवर सडकुन टीका..

मुंबई : अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

राजकारण हे मिमिक्री नाही. आम्हाला मिमिक्री, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. आवाज काढणं आता खूप झालं. आता आपण परिपक्व झालेला आहात. थोडा महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचा राजकारण किती काळ चालणार? काही संघटनात्मक काम करा. आमच्यावर एवढी संकटे असतानाही आमचा पक्ष लढतोय. राहुल गांधी यांनी ज्याप्रकारचे कष्ट घेतले आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

🤙 8080365706