जागतिक मस्त्यपालन दिन: शाेभीवंत मासे पळण्याकडे लोकांचा वाढता कल..

रत्नागिरी : काेणी घराची शाेभा वाढविण्यासाठी तर काेणी हाैस म्हणून घराघरात शाेभीवंत मासे पाळले जात आहेत.

यामुळे गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत रंगीबेरंगी माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. या बाजारपेठेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला काेट्यवधींची उलाढाल हाेत आहे. त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळू लागले आहे.मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २५ ॲक्वेरियमची दुकाने आहेत. या दुकानांमधून दिवसाला तीन ते चार हजार रुपयांची विक्री हाेते.

या माशांच्या व्यवसायातून वर्षाला सुमारे सव्वातीन काेटी इतकी उलाढाल हाेत आहे. रंगीबेरंगी माशांच्या दुनियेने, ते पाळण्याच्या हौसेने तरुणांना राेजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

🤙 8080365706