गारठ्याने सतत कोरड्या खोकल्याला सामोरे जावे लागते?..

खोकल्याने आपला घसा आणि छातीही काहीशी दुखायला लागते. पाहूयात खोकला कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय…काही वेळा हा खोकला इतका जास्त असतो की आपली नीट झोप तर होत नाहीच पण खोकून नंतर आपला घसा आणि छातीही काहीशी दुखायला लागते. पाहूयात खोकला कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय.

लवंग – मध

लवंग तव्यावर किंवा कढईमध्ये चांगली भाजून घ्यायची. भाजल्यानंतर लवंग थोडी फुगते आणि पांढरट होते. गार झाल्यानंतर तिची ठेचून पूड करायची आणि एका चमच्यात ही पूड घेऊन त्यामध्ये मध घालायचा. हे चाटण घेऊन झोपल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. 

दूध-हळद

हळदीमध्ये अंटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे अनेकदा जखम झाल्यावरही त्याठिकाणी हळद लावली जाते. खोकला किंवा कफ म्हणजे आपल्याला इन्फेक्शन झालेले असते. अशावेळी गरम दूध आणि हळद घेतल्यास घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर यामध्ये थोडा गूळ घातला तरी ते आरोग्यासाठी चांगले असते

आलं – मीठ 

आलं चवीने तिखट असले तरी खोकल्यावर आले अतिशय गुणकारी असते. त्यामध्ये ॲंटीमायक्रोबियल आणि ॲण्टी इंफ्लमेटरी गुणधर्म असतात. आलं ठेचून त्यामध्ये मीठ घालून त्याचा रस मीठ घालून घेतल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. आल्याचा चहा घेतल्यासही घशाला आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे खोकला झाला असेल तर आधी हे घरगुती उपाय करुन पाहा आणि नंतरच डॉक्टरांकडे जा.  

🤙 8080365706