शिवाजी महाराज तो पुराणे जमाने के आदर्श ; राज्यपाल भगतसिंग कोशारी पुन्हा एकदा बरळले…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असे वक्तव्य केले.

आता या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या ६२ व्या दिक्षांत समारंभावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डि. लीट पदवी देवून सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, गडकरी आणि पवार दोन्ही नेते द्रष्टे आहेत. पीएचडी आणि डि. लीट पदवी पेक्षा दोन्ही नेत्यांचं कर्तृत्व मोठं आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही नेत्यांची प्रशंसा केली.दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, ‘शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है., असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय.

आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.आता राज्यपाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या आधीही राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.

🤙 8080365706