पत्नी पीडित पुरुषांसाठी इथे सुरू आश्रम…

औरंगाबाद : भांडण कोणतेही असो आरोपी तर पुरुषांनाच ठरवलं जाते. अशावेळी दाद मागायची कुठं या गोंधळात असलेल्या पुरुषांसाठी एक संस्था सुरू करण्यात आली आहे. पत्नी पीडित पुरुष आश्रम असे या संस्थेचे नाव असून ती औरंगाबाद येथे आहे

.घरात सासू सुनेचे भांडण होवो किंवा नवरा बायकोचे अडकतो तो नेहमी पुरुषच.पुरुषांची बाजू ऐकायला आणि समजून घ्यायला कोणीही तयार नसतं. किंबहुना त्यांचीही बाजू आहे याचा साधा विचारही कोणी करत नाही.सासू सुनेच्या वादात तर पुरुषांचे अक्षरशः सँडविच होते. हे वाद किरकोळ असतात तेव्हा पुरूष दुर्लक्षाय नमः चा जप करतात. पण जेव्हा हेच वाद चव्हाट्यावर येतात तेव्हा मात्र निर्दोष असलेल्या पुरुषांनाही शिक्षा भोगावी लागते.घर संसार आहे म्हंटल्यावर भांड्याला भांड लागणारच. पण सतत भांडी एकमेकांवर आदळून भांडी फुटायची वेळ येते तेव्हा त्या आवाजाने शेजाऱ्यांनाही त्रास होतो. औरंगाबाद येथील रहिवासी भारत फुलारे यांनी या आश्रमाची सुरवात केली. भारत हे स्वतः पत्नी पिडित आहेत. भारत यांचा २००४ मध्ये विवाह झाला होता. सुरूवातीला छान असलेले सगळे काही नंतर मात्र विस्कळीत झाले. पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि त्यांना कलम 498, 307 खाली त्यांना अटक करण्यात आली.या वादातून त्यांना जेलची हवा खावी लागली. ज्यावेळी त्यांचा पत्नीसोबतचा वाद कोर्टात होता त्यावेळी त्यांना मदत करणारे कोणी नव्हते. ते एकटे पडले होते. जवळपास दीड वर्ष ते मंदिरात राहिले. त्यांना अटक करण्याचा आदेश कोर्टाने दिला तेव्हा ते पळून गेले. उत्तराखंडमध्ये काही दिवस मिळेल ते काम करून उदरनिर्वाह केला. तिथे मृतदेह जाळण्याचेही काम त्यांनी केले.ते परत आले तेव्हा कोर्ट कचेऱ्याच्या कचाट्यात अडकले. २०१३ मध्ये त्यांनी पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला नाही. कारण त्यांच्याकडे पोटगी द्यायलाही पैसे नव्हते.मी इतराचे लग्न मोडावे या हेतूने हे काम करत नाही. मात्र कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांना होणारा मानसिक त्रास याचा किमान कुठं तरी विचार व्हावा यासाठी मी झटत आहे. माझ्या संस्थेत येणाऱ्या प्रत्येक पुरूषासाठी मी काम करत आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत असल्याचे मत संस्थापक भारत फुलारे यांचे आहे.काही काळात त्यांना तुषार वखरे व इतर तीन समदुःखी लोक येऊन फुलारे यांना भेटले व त्यांनी एकमेकांना मदत केली. तसंच १९ नोव्हेंबर २०१६ रोजी म्हणजेच “पुरुष अधिकार” दिवशी त्यांनी हे आश्रम स्थापन केले. या आश्रमात सध्या सात जण राहतात. तर अनेक लोकांना सल्ला देण्याचेही काम ही संस्था करते.

🤙 8080365706