
पुणे : आधीच महागाईचे चटके बसत असताना दुसरीकडे पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ झाली आहे.
पुण्यात सीएनजी दरात प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता सीएनजी 92 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत.मागील महिन्यातच सीएनजी गॅसच्या दरात चार रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रुपयाची दरवाढ करण्यात आल्याने दोन महिन्यात पाच रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली.
आज झालेल्या दरवाढीनंतर सीएनजीच्या दराने डिझेलचा दर गाठला आहे. डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात फक्त 36 पैशांचा फरक राहिला आहे. पुणे शहरात पेट्रोल 105.54 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर, डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. सीएनजी दरवाढीचा फटका पुण्यातील सामान्य वाहन चालक, रिक्षा चालकांना अधिक बसणार आहे. आधीच महागाईचा मार बसत असताना आता दुसरीकडे दरवाढीने खिशाला कात्री बसणार आहे.
