अर्बनच्या निवडणुकीत चिठ्ठ्यांचा खेळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी आज (बुधवारी) शासकीय धान्य गोदामात पार पडली. या निवडणुकीत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी विजयी मिळवला.

दरम्यान, मतमोजणी सुरु असताना कर्मचाऱ्यांना मतपेटीत काही चिठ्या सापडल्या.

 छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन सभासदांसाठी सावकार शाही नष्ट करणे यासाठी बँकेचा प्रयोग केला, तो यशस्वी झाला, पण बँकेला गळू चिकटलेत त्यांचा बंदोबस्त करा…,सरंजाम शाही नष्ट झाली पाहिजे, तरुण पिढी हवी, ५५ च्या वर सर्वांना हद्दपार करा, नवीन पिढीकडे कारभार सोपवा, संचालकांचे काटकसरीचे धोरण असावे तरच बँक गरुड झेप घेईल…,आता बंद झाले आमचे ठरलंय, उजव्या हाताने एकदा द्यायचे व डाव्या हाताने पाच वेळा घ्यायचे… अशा भावना सभासदांनी चिठ्ठ्यांमधून व्यक्त केल्या आहेत.

🤙 8080365706