मंत्रीमंडळ विस्तारात जे मंत्री होणार नाही, ते दुसरी नवरी शोधणार : विजय वडेट्टीवार

वाशिम : मंत्रिमंडळाचा विस्तार हिच खरी परिक्षा असून,मंत्री होण्यासाठी सर्वांनीच बाशिंग बांधून ठेवलंय, पण ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते दुसरी नवरी शोधातील. असे वक्तव्य काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केले आहे.

मंत्री होण्याचं सर्वांना आश्वासन दिलंय त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तारात जे मंत्री होणार नाही, ते दुसरी नवरी शोधणार. त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही हे परिस्थितीनुसार ठरवू, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. यामुळे एकिकडे अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे आणि भाजप महायुतीच्या सरकारची लवकरच सर्वात मोठी परीक्षा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्पात या सरकारचा कस लागणार आहे.

यावर हे सरकार किती तग धरेल, हे ठरेल, असं भाकित काँग्रेसचे अनुभवी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचं मोठं नाराजी नाट्य सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मनं मात्र घट्ट जुळली आहेत, असं विजय विडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न झालाय, हे चुकीचं असल्याचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. शेगाव येथील यात्रेत मोठं शक्तिप्रदर्शन होणार असं म्हटलं जातय. मात्र वडेट्टीवार म्हणाले, शेगावची सभा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न नाही तर लोकांच्या आवाजाला बळ देण्याचा प्रयत्न, यात सहभागी होण्याचं खुलं आवाहन केलंय… इतक्या मोठ्या प्रमाणात अंतर पदयात्रा करणारा राहूल गांधी जगातला एकमेव नेता आहे..

🤙 8080365706