हिवाळ्यात शरीर तंदुरस्त ठेवायचेयं?

हिवाळा सुरू झाला की, प्रत्येक जण थंडीपासून स्वतः चा कसा बचाव करेल, आणि कसं आपल्या शरीराला उबदार ठेवेल याची काळजी घेत असतो. बरेच जण व्यायाम देखील करण्यास टाळाटाळ करतात. हिवाळ्यात जर शरीर तंदुरस्त ठेवायचे असेल तर, योगासनापेक्षा उत्तम पर्याय नाही.

योग मनासह शरीराला देखील स्थिर ठेवण्यास मदत करते. योगासने घरच्या घरी प्रभावीपणे करता येतात. आज आपण अशाच पाच योगासनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपलं शरीर उबदार ठेवेल, तसेच फिट राहण्यास देखील मदत करेल.वशिष्ठासनवशिष्ठासन या आसनाला ‘साईड प्लँक पोज’ असेही म्हणतात. सर्वप्रथम हाताने योगा मॅटवर बसा आणि पाय सरळ पसरवा. हाताच्या ताकदीचा वापर करून, आपले शरीर तुमच्या बाजूला उचला जेणेकरून आपले शरीर जमिनीच्या 45 अंश कोनात असेल. दुसरा हात सरळ हवेत वर करा. मजल्याच्या संपर्कात असलेल्या पायावर दुसऱ्या पायाने विश्रांती घ्या. हे आसन केल्याने पाय, ओटीपोट आणि हात मजबूत बनते.पायांच्या मागील बाजूस चांगला ताण येतो. या आसनाने संतुलनाची भावना सुधारली जाते. नौकासननौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. या आसनात शरीराचा आकार नावेसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन म्हटले जाते.

सर्वप्रथम पोटावर झोपावे, पावले जुळली असावीत. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचे बॅलन्स येईल. ह्या स्थितीत थोडे थांबावे. आणि सावकाश आसन सोडावे.

शीर्षासन

शीर्षासन या शब्दाची फोड केली तर संस्कृतातील ‘शीर्ष’ आणि ‘आसन’ अशी त्याची फोड होते. शीर्ष म्हणजे डोकं आणि आसन म्हणजे ते करण्याची पद्धत. सर्वप्रथम, दोन्ही पाय दुमडून वज्रासनामध्ये या. दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवून डोकं त्या बोटांमध्ये व्यस्थित ठेवा. आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात पाय वर करता येणार नाही. पण थोडे लक्ष केंद्रित केले की, आपला पाय वर नेता येईल. पाय सरळ वर घेऊन अशा आसनात 30 सेकंद राहा. श्वास सुरळीत असू द्या. मानेची हालचाल करु नका. कारण त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. आसनात असताना काहीही त्रास होत असेल तर आसन सोडू शकता.

🤙 8080365706