जठारवाडी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

कोल्हापूर : ग्रामपंचायत जठारवाडी तालुका करवीर येथील ग्राम विस्तार अधिकारी आनंदा पांडुरंग द्रविड यांच्या वर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित केले .

काही दिवसापूर्वी जठारवाडी गावामध्ये कॉलरा गॅस्ट्रोची साथ मोठ्या प्रमाणात आली होती. या मध्ये 200 हूनअधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली. या बाबत जिल्हा परिषद च्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी जठारवाडी येथे जावून संबंधित प्रकरणाची माहिती घेतली असता जठारवाडी मध्ये ग्रामसेवक उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर टीसीएल रजिस्टर मिळाले नाही, पिण्याचे पाण्याचे नियमित शुद्धीकरण होत नव्हते, गावातील पाणीपुरवठा पाईपलाईन मध्ये सात ठिकाणी गळती आढळून आली. तसेच ग्रामसेवक व जल सुरक्षकांचे पाणीपुरवठाकडे दुर्लक्ष असल्याचे आढळून आले यामुळे गावामध्ये कॉलरा गॅस्ट्रोची लागण नागरिकांना झाली असा अहवाल जिल्हास्तरीय समितीने दिल्यानंतर आज सोमवारी ग्रामसेवक द्रविड यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टाकी गेल्या वर्षभर स्वच्छ केली नव्हती. गावामध्ये दूषित पाणीपुरवठा सुरू होता. या पाण्यामुळेच गावातील नागरिकांना गॅस्ट्रोचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने याबाबतची सखोल चौकशी करून सदर प्रकरणाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिला. या अहवालानंतर या प्रकरणात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जबाबदार असल्याचे आढळून आले.

🤙 8080365706