
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात.मात्र, आता मंत्री दीपक केसरकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं, अशी इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आहे.
कोकणात लवकरच राजकीय भूकंप? ठाकरेंच्या शिलेदाराची उदय सामंतांसोबत गुप्त बैठक! मंत्री दीपक केसरकर नवी मुंबईतील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना म्हणाले, की दोन्ही गट एकत्र येणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मात्र दोन्ही गट एकत्र यावे ही राज्याच्या जनतेची इच्छा आहे.यासोबतच अमोल किर्तीकरांबाबतही केसरकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. अमोल किर्तीकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
