गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (रविवारी) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून गडहिंग्लज-हनिमनाळ, कडगाव-कौलगे गटातील बहुतांश केंद्रांवर छ.शाहू समविचारी आघाडीला मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

जवळपास २० केंद्रांअखेर ११०० हून अधिक मतांची आघाडी मुश्रीफांच्या पॅनेलने घेतल्याने नूल-नरेवाडी गटातून विरोधी काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीला हे मतदान वजा करताना दमछाक होणार आहे.
दरम्यान, सकाळी संस्था गटात छ. शाहू आघाडीचे सोमनाथ अप्पी पाटील यांनी आ. राजेश पाटील यांच्या श्री काळभैरव आघाडीचे उमेदवार व कामगार नेते शिवाजी खोत यांना १६२ मतांनी पराभूत केले आहे. खोत यांना ३७ मते मिळाली तर १ मत बाद झाले. आ. हसन मुश्रीफ यांनी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत छ. शाहू समविचारी आघाडी केली होती. या विरोधात चंदगडचे आ. राजेश पाटील, माजी आ. अॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, कामगार नेते शिवाजी खोत यांच्या श्री काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीने टक्कर दिली.
या क्षणापर्यंत पडलेली मते
कौलगे-कडगाव गट
प्रकाश शहापूरकर (छ. शाहू आघाडी) – ४७६३ आघाडीवर
विश्वनाथ स्वामी (छ. शाहू आघाडी) – ४२९७ आघाडीवर
देसाई बाळासो (छ. शाहू आघाडी) – ४४२५ आघाडीवर
अशोक देसाई (काळभैरव आघाडी) – २६४४
देसाई सुजित (काळभैरव आघाडी) – २६४२
पाटील विकास (काळभैरव आघाडी) – २४६२
भडगाव-मुगळी गट
प्रकाश चव्हाण (छ. शाहू आघाडी) – १७७२ आघाडीवर
सतीश पाटील (छ. शाहू आघाडी) १७५५ – आघाडीवर
अमर चव्हाण (काळभैरव आघाडी) – ९३१
बाबासाहेब पाटील (काळभैरव आघाडी) – ८०७