गंगावेश रोड, लक्ष्मी, दत्त गल्ली कसबा गेट परिसरातील सभासद उमेश निगडे यांच्या पॅनेल सोबत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छोटी छोटी कर्ज देऊन गंगावेश रोड, लक्ष्मी गल्ली, दत्त गल्ली , कसबा गेट परिसरातील सभासदांच्या व्यवसाय उद्योगास हातभार लावल्यामुळे आम्हा सभासदांना खाजगी लोकांकडून टक्केवारी मोजून पैसे घ्यावे लागले नाहीत, म्हणूनच आम्ही सर्व सभासद उमेश निगडे आणि श्रीमती गीतादेवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलसोबत या निवडणुकीत राहणार आहे, अशी भावना या परिसरातील सभासद, नागरिकांनी व्यक्त केली.

कोल्हापूर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक उमेश निगडे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सभासदांना अडचणीच्या काळातअहवाल सालात बँकेला उच्चांक नफा मिळवून दिला. त्याचबरोबर सभासदांना डिव्हिडंट दिला. बँकेच्या आधुनिक कार्यप्रणालीने प्रगती करून बँक नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने शाहू महाराज भास्करराव जाधवांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ही आम्हा बारा बलुतेदार सभासदांना अभिमान वाटावा अशी गोष्ट असल्याची भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली.

दरम्यान, या परिसरात सुमारे अडीच तास घरोघरी सभासदांच्या भेटी घेऊनअर्बन बँक निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या कपबशी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन पॅनलचे प्रमुख उमेश निगडे आणि सर्व उमेदवारांनी केले.
यावेळी या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलांनी उमेश निगडे व इतर उमेदवारांशी संवाद साधून चालू अहवाल डिव्हिडंड मिळाला नसल्याची खंत व्यक्त करून पुढील वर्षी तरी डिव्हीडंट मिळवून द्या, अशी मागणी केली.
यावेळी या परिसरातील सभासद कार्यकर्ते दिलीप व्हडगे, सुनील माजगावकर, राजू पावसकर, मोहन माजगावकर, संजय पावस्कर, निलेश सावंत, सौरभ वडणगेकर, तेजस वडणगे कर राजू सुतार ,ब्रह्मानंद वडणगेकर अभिषेक सुतार ,संजय कारेकर ,आकाश आडीसरेआदींसह कार्यकर्ते सभासद व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

  
🤙 8080365706