कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष-२०२२ निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेमार्फत राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. येथील छ.शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल मैदानावर माजी गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विश्वनाथ मगदूम सचिव कौन्सिल ऑफ एज्युकेशन, सी इ ओ सिनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सचिन शिरगावकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन धनंजय वेळूकर, सचिव महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन शत्रुघ्न गोखले, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डायरेक्टर विनायक भोसले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आर.डी.पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रिन्सिपल जी बी पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, शहाजी लॉ कॉलेज प्राचार्य प्रवीण पाटील, सेंट्रल इंडीयन रेल्वे बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षक जितू माने, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, सुरेश ढोणुक्षे, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अमर पाटील, बाबसाहेब पाटील, अल्ताफ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रिय फिबा रेफ्री मनोज कोठे व अमर पानारे यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे उपाध्यक्ष नितीन दलवाई आणि हितेश मेहता, सेक्रेटरी प्रा.डॉ शरद बनसोडे, प्रा.डॉ सुरेश फराकटे, डॉ. राजेंद्र रायकर, मानसिंग पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शरद बनसोडे यांनी केले तर आभार नितीन दलवाई यांनी मानले सूत्रसंचलन तेजस्विनी महाडिक यांनी केले.
तब्बल 20 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला राज्यस्तर सब- ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. सदर स्पर्धा दिनांक 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत होणार आहे. यामध्ये 13 वर्षाखालील मुलींमध्ये 18 संघ तर मुलांमध्ये 24 संघ सहभागी झाले आहेत.सदर स्पर्धेचे प्रायोजक डी वाय पाटील ग्रुप व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल हे आहेत.
स्पर्धेचे संयोजन जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष नितीन दलवाई आणि हितेश मेहता, सेक्रेटरी प्रा.डॉ शरद बनसोडे, प्रा.डॉ सुरेश फराकटे, डॉ. राजेंद्र रायकर, मानसिंग पाटील, विनायक साळोखे, जेसिका अँड्र्यूज, सचिन पांडव, संदीप खोत, वंदना पाटील, अमित दलाल, केदार सुतार, उदय पाटील, तेजस्विनी महाडिक, नारायण पाटील, परेश नायकवडे, शुभम पाटील, अनिरुद्ध विटेकर, आकाश जाधव, आशुतोष खराडे यांनी केले.